Hadapsar News : छापा पडणार असल्याच्या बहाण्याने सराफ दुकानातून २ कोटींचे सोने पळवले, लोणी काळभोर येथील व्यवस्थापकावर गुन्हा दाखल..


Hadapsar News : सराफ दुकानात प्राप्तिकर विभागाचा छापा पडणार असल्याच्या बहाण्याने व्यवस्थापकाने ५ किलो सोने व ५० किलो चांदी आणि रोकड असा एकूण २ कोटी २७ लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना उघडकी आली आहे.

ही घटना हडपसर परिसरातील माळवाडी रस्त्यावरील वसुंधरा ज्वेलर्स या सराफ दुकानामध्ये घडली आहे. याप्रकणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १२ मार्च २०२२ ते ८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडली आहे.

याबाबत ज्योतिरादित्य ऊर्फ यश राजेंद्र मोकाशी (वय. २२, रा. बाणेर रस्ता, औंध) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्यवस्थापक विनोद रमेश कुलकर्णी (वय.३५, रा. लोणी काळभोर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी ज्योतिरादित्य यांनी दोन वर्षांपूर्वी सराफ व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्याकडे आरोपी विनोद कुलकर्णी दुकानात व्यवस्थापक म्हणून कामास होता. यश यांनी दागिने घडविण्यासाठी पाच किलो सोने आणि ८५ किलो चांदी खरेदी केली होती. Hadapsar News

त्यांनी सोने, चांदी व्यवस्थापक कुलकर्णी याच्याकडे दिली होती. त्यानंतर यश उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर यश मागील डिसेंबरमध्ये पुण्यात परतले. त्यावेळी त्यांना दुकानात पावणेतीन किलो सोने आणि ५० किलो चांदी कमी असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत कुलकर्णीकडे विचारणा केली.

त्यावर कुलकर्णीने सात फेब्रुवारीला सर्व सोने, चांदी परत करून हिशेब देतो, असे सांगितले. त्यानंतर आठ फेब्रुवारीला कुलकर्णीने सकाळी सराफ दुकानातील कर्मचाऱ्याशी मोबाईलवर संपर्क साधला. त्याने मालकाला हिशेब द्यायचा आहे. तसेच, सराफ दुकानात प्राप्तिकर विभागाचा छापा पडणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, त्यानंतर कुलकर्णीने सराफ दुकानातील कर्मचाऱ्यांकडून उर्वरित सोने आणि चांदी घेतले आणि तो पसार झाला. कुलकर्णीने पाच किलो, ५० किलो चांदी आणि दोन लाखांची रोकड अशी एकूण सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!