पुणेकरांसाठी चिंताजनक बातमी! H3N2 वायरस ने पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू…!


पुणे : H3N2 Virus आता किती धोकादायक ठरू शकतो याचा आतापर्यंत डॉक्टर आणि जाणकार केवळ अंदाज बांधत होते. पण गेल्या काही दिवसांपासून या विषाणूने आपला खरा रंग दाखवायला सुरूवात केली आहे.

H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने महाराष्ट्रातील पहिला बळी नगरमध्ये घेतला असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये या व्हायरसमुळं एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे. या मृत्यूमुळं आता राज्यात या व्हायरसमुळं मृत्यू झालेल्यांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.

 

दरम्यान एबीपी माझानं दिलेल्या वृतानुसार, महाराष्ट्रातील पहिला बळी नगरमध्ये घेतला आहे. इन्फ्लुएन्झा व्हायरसची लागण झालेल्या एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय विद्यार्थ्याला कोरोनासह इन्फ्लुएन्झा व्हायरसची लागण झाली होती. त्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

दरम्यान, मुंबई पुण्यासह राज्यातल्या काही मोठ्या शहरांमध्ये या विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. मार्च महिन्यातल्या पहिल्या १५ दिवसांमध्ये मुंबईत या विषाणूचे ५३ रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. यातला एक रुग्ण अहमदनगरचा तर दुसरा नागपूर येथील आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!