बारामतीत दिवसाढवळ्या तरुणांवर कोयत्याने वार, रंग लावण्यावरून झाला वाद…!


बारामती : रंगपंचमीच्या दिवशी बारामतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. रंग लावण्यावरून झालेल्या वादानंतर सहाजणांनी तिघांवर कोयता, चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी सहाजणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार अशोक जाधव याने फिर्याद दिली आहे. यामुळे सध्या चौकशी सुरू आहे. फिर्यादी हा त्याचे मित्र ऋतिक कांबळे, सौरभ गायकवाड यांच्यासह रंग खेळून मिशन हायस्कूलच्या ग्राऊंडवर बसले होते. यावेळी सहाजण आले.

त्यांच्यात व फिर्यादी यांच्यात रंग लावण्यावरून वाद झाला. तो वाद आपसात मिटून ती मुले तेथून निघून गेली. त्यानंतर वसंतनगर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाशेजारी फिर्यादी आला असताना ही मुले हातामध्ये कोयता आणि चॉपर घेऊन तेथे आली.

त्यांना पाहून फिर्यादी मिशन हायस्कूलच्या ग्राऊंडवर पळत गेला. दोन, तीन अज्ञात तरुणांकडे दगड आणि सिमेंटचे ब्लॉक होते. साहिल लोंढे याने फिर्यादीला गाठत तुला खूप मस्ती आली आहे. आज तुझा गेमच करतो, असे म्हणाला.

आजूबाजूचे लोक भांडणे सोडविण्यासाठी आले असताना त्यांना धमकावत आरोपी सहाजण घटना स्थळावरुन निघून गेले. सौरभ गायकवाड मध्ये आला असता त्याच्याही मांडीवर देखील आरोपींनी कोयत्याने वार केला.

याबाबत पोलिसांनी आदित्य उर्फ आदेश मोहिते, यश मोहिते, साहिल लोंढे यासह अन्य तीन अनोळखी अशा सहा जणांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!