Guwahati Murder Case : पुण्यातील हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीतील हॉटेलमध्ये हत्या, बंगाली जोडप्याला अटक, नेमकं प्रकरण काय?


Guwahati Murder Case : पुण्यातील हिरे व्यापाराचा गुवाहाटीत ५ स्टार हॉटेलमध्ये खून झाल्याचं समोर आले आहे. ही हत्या लव्ह ट्रँगलमधून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकणी पोलिसांनी एका बंगाली जोडप्याला अटक केली आहे.

संदीप कांबळे पुण्यातील श्रास्तीनगर येथील रहिवाशी आहेत. याप्रकरणी बंगाली जोडप्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी खूनाची कबूली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून संदीप कांबळे हा एक्स गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करत असल्याचेही तपासातून उघड झालेय. गुवाहाटी पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

विकास कुमार शॉ (वय. २३) आणि अंजली शॉ (वय. २५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दिंगत बोरा यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, संदीप कांबळे यांच्या हत्येच्या आरोपाखाली बंगाली जोडप्याला अटक केली आहे. विकास कुमार शॉ आणि अंजली शॉ अशी अरोपींची नावे आहेत.

या आरोपींनी आपणच खून केल्याची कबूली दिली आहे. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू या पाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हिरे व्यापारी संदीप कांबळे यांचा संशयतरित्या खून झाला. Guwahati Murder Case

मिळालेल्या माहिती नुसार, संदीप कांबळे व्यावसायाच्या निमित्ताने विविध ठिकाणी फिरतात. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कामाख्या मंदिरात संदीप कांबळे गेले होते. गुवाहाटी येथून परतत असताना कोलकाता विमानतळावर त्यांची अंजली शॉ हिच्याबरोबर भेट झाली.

त्यावेळी दोघांमध्ये फोन क्रमांकाची देवाणघेवाण झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.  दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. दोघांमध्ये पुणे, कोलकाता येथे वारंवार भेटी झाल्या. संदीप कांबळे विवाहित असतानाही अंजलीला लग्नाचा प्रस्ताव दिला.

संदीप कांबळेचा हा प्रस्ताव अंजलीने नाकारला. त्यानंतर बोलणे , भेटणंही टाळले. संदीप कांबळेला ही गोष्ट रुचली नाही. त्याने अंजलीला बदनाम करण्यास सुरुवात केले. संदीप कांबळे यानं अंजलीच्या कुटुंबियांना आणि प्रियकर (विकास शॉ) यांना फोन करुन बदनामी केली.

अंजलीसोबतचे प्रायव्हेट फोटो प्रियकलारा पाठवले. त्यामुळे अंजली आणि विकास यांच्या नात्याला तडा गेला.. पण काही कालावधीनंतर दोघांमध्ये समेट झाली. त्यानंतर दोघांनी संदीपच्या मोबाईलमधून पुरावे मिटवण्यासाठी षडयंत्र रचलं.अंजलीने प्रियकराच्या मदतीने संदीपचा मोबाईल हिसकावून घेऊन अनैतिक संबंधाचे सर्व पुरावे मिटवण्याची योजना आखली.

अंजलीने संदीपला कोलकात्याला भेटायला बोलवलं. पण तिचा समोरुन फोन आल्यानं संदीपला संशय आला. संदीपनं तिला गुवाहाटी येथे भेटायाला बोलवलं. अंजलीने प्रियकर विकास याच्यासोबत सोमवारी गुवाहाटी गाठली. संदीपने नवव्या मजल्यावर रुम बूक केली होती.

विकासने तिथेच दहाव्या मजल्यावर रुम घेतली. अंजलीने विकासला नवव्या मजल्यावर बोलवलं.. त्यानंतर संदीप आणि विकास यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विकासनं मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यामध्ये संदीपचा मृत्यू झाला.

घटनेनंतर विकास आणि अंजलीने तेथून पळ काढला. पण पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवले. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी विमानतळावर अंजली आणि विकासला ताब्यात घेतले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!