लोणी काळभोर येथे गुटख्याच्या कारवाई दीड लाखांची झाली डील? नागरिकांमध्ये जोरदार चर्चा, नेमकं प्रकरण काय?


लोणी काळभोर : दोन जणांना पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून अवैध तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोघांना रविवार (ता.६) रोजी लोणी काळभोर पोलिसांनी बोरकर वस्ती परिसरात पकडले होते. या कारवाई दरम्यान, कनिष्ठ पोलिस अधिकारी व त्याच्या सहकाऱ्यांनी आरोपींकडून सुमारे दीड लाख रुपये उकळल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कामगिरीवर सवाल उपस्थित केला जात आहे. एका खाजगी ट्रॅव्हल्स बस मधून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून गुटखा येणार असून तो बोरकर वस्ती परिसरात उतरवण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.

या माहितीच्या आधारे तेथे सापळा रचण्यात आला. काही वेळाने सोलापूर बाजूकडून पुण्याकडे निघालेली एक ट्रॅव्हल्स बस त्या परिसरात थांबली. गाडीतून दोन जणांनी चार पोती उतरविली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. दोन संशयितांना ताब्यात घेऊन पोत्यांची झडती घेतली असता, त्यामध्ये ९४ हजार ५०० रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले.

सदर कारवाई टाळण्यासाठी लोणी काळभोर परिसरातील एका मटका किंगने पकडलेला माल परत मिळवून देण्यासाठी एका कनिष्ठ अधिकाऱ्यासोबत मध्यस्थी केली. यावेळी सदर प्रकरण दाबण्यासाठी तीन लाखांची मागणी करण्यात आली होती. जिल्हा परिषद शाळेजवळ झालेल्या तडजोडी मध्ये दीड लाख रुपये देण्याचे ठरले. दोन्ही आरोपींनी नातेवाईक व मित्रपरिवाराकडून पैसे घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या एका दालनात कनिष्ठ पोलिस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनां दिले.

त्यानंतर पोलीस ठाण्यातील एका कनिष्ठ अधिकाऱ्याने दोघांनाही रविवारी सकाळी पकडल्यानंतर रात्री अकरानंतर सोडून दिले. परंतू दोघांविरोधात भारतीय न्याय संहीता कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कारवाई न करण्यासाठी घेतलेले पैसे गेले कोठे? असा यक्षप्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत असल्याने या मांडवलीची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. तर शाळा, महाविद्यालये, दवाखान्यासह चौकाचौकातील पान टप-र्यांवर नशा येत असलेलया पानांची विक्री सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु पोलिस प्रशासन यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे या कनिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!