Gunaratna Sadavarte : संचालक मंडळाच्या महागड्या हॉटेलमधील बैठका, सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका, झाली मोठी कारवाई…


Gunaratna Sadavarte : गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासंबंधित मोठी बातमी समोर येत आहे. सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याकडून मोठा दणका देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांचे संचालक पद रद्द करण्यात आलं आहे.

यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे तज्ञ संचालक म्हणून गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे दोघेही एसटी बँकेवर राहू शकणार नाही. तर सर्वसाधरण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.

दरम्यान, याबाबत एसटी कामगार संघटनेच्या संदीप शिंदेंनी तक्रार केली होती. ‘जेव्हापासून सदावर्ते यांची सत्ता एसटी कॉपरेटिव्ह बँकेवर आली तेव्हापासून ही बँक खड्ड्यात घालण्याचा जणू त्यांनी निर्णय घेतला होता आणि अशी शंकाच आता लोकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. Gunaratna Sadavarte

एसटी कर्मचारी हवालदिल झाला आहे. आम्हाला कर्ज मिळत नाही. सदावर्ते दाम्पत्याच्या हातात एसटी बँकेचा कारभार गेल्यापासूनच नाराजी व्यक्त केली जात होती. सदावर्ते चुकीचा कारभार करत असल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता. त्यानंतर सदावर्तेंनी नियम मोडल्याचं निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली.

तब्बल चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेतून ४७९ कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढल्या आहेत. कर्ज आणि ठेवी यांचा ताळमेळ बसत नसल्याने कर्जवाटपावर मर्यादा आल्या आहेत. यामुळे अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.

यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे खाते असलेली बँक वाचवण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करावी’, अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली होती. यामुळे आता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!