एकनाथ शिंदेसारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली…!


मुंबई : उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीला गद्दारी असे संबोधन्यात आले. उद्धव ठाकरे गट आजही या 40 आमदारांना गद्दार असेच संबोधतो.

दरम्यान, शिंदे यांच्या सोबत बंडात सहभागी असलेल्या असलेल्या पैकी मंत्री गुलाबराव पाटील यांनी चक्क आपल्या गद्दारीची कबुली दिली आहे. त्यांनी एका जाहीर भाषणात स्पष्ट कबुली देत म्हटले आहे की, ‘होय, मी गद्दारी केली. एकनाथ शिंदे यांच्यासारखा मराठा चेहरा मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली. आज, मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसतो यातच मतदारसंघाचा जयजयकार आहे,’ असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

पाटील यांच्या वक्तव्याची आता राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे. आजवर एकनाथ शिंदे गट नेहमीच सांगत आला आहे की, आम्ही गद्दार नाही आहोत. आम्ही बंडखोर आहोत. आम्ही गद्दारी नव्हे तर उठाव केला आहे. दरम्यान, खरी शिवसेना आम्हीच हा दावाही शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला. निवडणूक आयोगानेही मग हा दावा मान्य करत शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बहाल केली. त्यामुळे आगोदरच अनेक तर्कवितर्क सुरु असताना आता थेट गुलाबराव पाटील यांचा खुलासा आला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!