…तर काँग्रेससोबत युती करण्यास तयार! गुलाबराव पाटलांचे मोठे वक्तव्य


मुंबई : राजकारणात नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणार विधान केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. मात्र, त्याच काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही.

पण राहुल गांधींनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. यामुळे आता काँग्रेसकडून काय उत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्या करता केलेली आहे हिंदुत्व करता केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही कधी बसू शकतो, हे कधीच होणार नाही असेही पाटील म्हणाले.
Views:
[jp_post_view]
