गुजराती टोरेंट कंपनी ठरली अव्वल, महावितरण मात्र तळाला, देशात 49व्या स्थानी, अदाणींचा देशात डंका…

नागपूर : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या चौदाव्या वार्षिक क्रमवारीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) देशात ४९व्या क्रमांकावर आहे. असे असताना राज्यात खासगी कंपन्या अग्रेसर असून महावितरण मागे आहे. यामुळे याकडे वीज तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

क्रमवारीत अव्वल कंपन्यांनी शंभर गुणांच्या आसपास कामगिरी केली असताना महावितरणचा गुणांक केवळ १६.६३ इतकाच आहे. यामुळे येणाऱ्या काळात यामध्ये बदल होईल की नाही हे लवकरच समजेल. मात्र सध्याची ही परिस्थिती समोर आली आहे. यामध्ये गुजरातमधील टॉरेंट पॉवर (अहमदाबाद) आणि टॉरेंट पॉवर (सुरत) यांनी शंभर गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला आहे.
गेल्यावर्षी महावितरण ५२व्या स्थानावर होते. यंदा तीन स्थानांची सुधारणा झाली. परंतु कंपनी अजूनही खाली आहे. कंपनीचा गुणांक मागील वर्षी १.५२ इतका होता, अशी माहिती एआयआरईए संघटनेचे सल्लागार सुधीर बुधे यांनी दिली. महाराष्ट्रातील अदाणी (मुंबई) वीज वितरण कंपनीने सुमारे ९९.७५ गुण मिळवत ‘ए प्लस’ श्रेणी कायम ठेवली.

तसेच मुंबईतील टाटा पॉवर वीज वितरण कंपनीलाही ‘ए’ श्रेणी मिळाली आहे. या दोन्ही कंपन्या राष्ट्रीय क्रमवारीत वरच्या गटात आहेत. राज्यात अनेक भागात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणचा क्रमांक ४९ वा आहे. यामुळे कामगिरी निराशाजनक आहे.
दरम्यान, देशातील वीज वितरण कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा चौदाव्या वार्षिक अहवालात जानेवारी २०२६ मध्ये करण्यात आले आहे. राज्यातील तीन कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणारी महावितरण राष्ट्रीय क्रमवारीत अजूनही खालीच आहे. कामगिरीचा आलेख श्रेणी ‘सी-मायनस’ वरून ‘सी’ इतका उंचावला आहे.
तेराव्या वार्षिक अहवालात ५२ व्या स्थानावर असलेल्या महावितरणने यंदा तीन पायऱ्या वर चढत ४९ वे स्थान मिळवले. कंपनीचा गुणांक १.५२ वरून १६.६३ पर्यंत वाढला. यामुळे आर्थिक व कार्यक्षमतेच्या बाबतीत कंपनी अजूनही कमी आहे. ऊर्जा क्षेत्रातील या राष्ट्रीय मूल्यांकनात देशातील ५४ वीज वितरण कंपन्यांचा समावेश आहे.