Gujarat Vadodara News : ना लाईफ जॅकेट, ना इतर कोणतीही सुरक्षा, गुजरात दुर्घटनेत १२ विद्यार्थ्यांचा मृत्यू..


Gujarat Vadodara News : गुजरातमधील वडोदरा येथे मुलांनी भरलेली बोट उलटल्याने अनेक शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. शाळकरी मुले हरणी येथील व्होटनाथ तलावात बोटिंगसाठी गेली होती.

या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १२ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. या अपघातावर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

तलावात बोटींग करताना विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट न घालता बोटीत बसवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच 16 क्षमतेच्या बोटीत 25 हून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यामुळे तलावात बोट उलटली. Gujarat Vadodara News

मिळालेल्या माहिती नुसार, हर्णी तलावात २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी भरलेली बोट पलटी झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ बचाव मोहीम राबवून काही विद्यार्थ्यांना वाचवले.

तलावातून बाहेर काढलेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच डीसीपी, एसीपी यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. या अपघातावर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

वडोदरा येथील हर्णी तलावात बोट उलटल्याने झालेल्या जीवितहानीमुळे व्यथित. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!