इतिहासात पहिल्यांदाच गुजरातच्या सभागृहात विरोधी पक्षनेता नाही…!


गांधीनगर : गुजरात विधानसभेला सभागृहाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता नसेल. अपुऱ्या संख्याबळामुळे सभापती शंकर चौधरी यांनी काँग्रेसची पदासाठीची विनंती नाकारली आहे.

डिसेंबर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत, १८२ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसला फक्त १७ जागा मिळाल्या होत्या. या जागा विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक जागांच्या तुलनेत १० टक्क्यांहूनही कमी आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप) राज्यात विक्रमी १५६ जागांसह सत्तेत परतला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापती चौधरी यांनी काँग्रेसची विरोधी पक्षनेतेपदासाठीची विनंती नाकारली.

काँग्रेसने अमित चावडा यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे केले होते. १९८५ मध्ये, सत्ताधारी काँग्रेसने आवश्यक संख्याबळ नसतानाही जनता पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाची परवानगी देण्यास सहमती दर्शवली होती. २०१४ पासून काँग्रेस हा लोकसभेतील दुस-या क्रमांकाचा पक्ष देखील आहे परंतु सलग दोन राष्ट्रीय निवडणुकांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी जागा मिळाल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!