गुजरात गोधा हत्याकांडातील जन्मपेठ झालेले आरोपी पॅरोल रजेवर फरार होवून मंचर येथे चोरी करताना आळेफाटा पोलीसांकडून जेरबंद..
आळेफाटा : आळेफाटा पोलीसांनी एक मोठी कामगिरी बजावली आहे. आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत मौजे आणे ता. जुन्नर जि. पुणे गावचे हद्दीत इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाचे आतील मोकळे जागेत फिर्यादी सोमनाथ नारायण गायकवाड हा त्याच्या टेम्पोमध्ये टायर घेवून सोलापुर येथे जात होते. त्यांना झोप आल्याने गाडी रस्त्याचे कडेला लावून झोपी गेले.
नंतर चोरट्यांनी टेम्पोची पाठीमागील ताडपत्री व रस्सी तोडून गाडीच्या आतील लहान टायर व मोठे टायर चोरून नेले. आळेफाटा पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करीत असताना मंचर पोलीस स्टेशन व सिन्नर पोलीस स्टेशन, नाशिक येथे गाडयांची पाठीमागील बाजुने ताडपत्री फाडून गाडीतील मुद्देमाल चोरून नेलेबाबत अशाच प्रकारचे गुन्हे दाखल होते.
यामुळे गुन्हा करण्याची पध्दत ही एकाच प्रकारची असल्याने सदर गुन्हयांचा अभ्यास करून अशा प्रकारचे गुन्हे करणारी टोळी ही गुजरात राज्यातील गोध्रा या ठिकाणची असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार याबाबत पोलीस तपास सुरू होता.
पोलिसांनी नाशिक येथूनआरोपी सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा, साहील हनीफ पठाण सुफीयान, सिकंदर चंदकी, आयुब इसाग सुनठीया, इरफान अब्दुलहामीद दुरवेश, गोध्रापंचमहाल यांच्यासह ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाचे अनुषंषाने सखोल चौकशी केली. आरोपींनी आळेफाटा, मंचर तसेच सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा केल्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी ही पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे, रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, रविंद्र चौधर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, फौजदार चंद्रा डुंबरे, विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, आमित पोळ, अमित माळुंजे, नविन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.