Gujarat Bridge Collapse : देशात पुन्हा एकदा मोठी दुर्घटना! गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, एकाचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती..


Gujarat Bridge Collapse  गुजरात : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात निर्माणाधीन पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ओव्हरब्रिजचा मोठा भाग कोसळला आणि या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. Gujarat Bridge Collapse

या दुर्घटनेमध्ये एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला झाल्याची देखील माहिती मिळत आहे. तर गुजरात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. Gujarat Bridge Collapse

गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये काम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या अपघातामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

पालनपूरमध्ये आरटीओ सर्कलच्या जवळ पुलाचे काम सुरू असताना ही घटना घडली आहे. रिक्षाचालक जीव वाचवण्यासाठी धावत असताना अचानक पुलाचा स्लॅब कोसळल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसते आहे.

पूल कोसळल्याचा मोठा आवाज आला त्यानंतर आजूबाजूचे लोक घाबरले आणि त्यांनी तिथून पळ काढला. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. यासंबधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

आरटीओ सर्कल येथे बांधकाम सुरू असलेला हा ओव्हरब्रिज गुजरातमधील सर्वात उंच पूल असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्यास सुरुवात केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!