जीएसटी कपातीचा सर्वसामान्यांना दिलासा; डी मार्टमधील ‘या’ वस्तू होणार स्वस्त, पहा संपूर्ण यादी….

पुणे : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जीएसटी कौन्सिलची 56 वी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जीएसटीतील 12 आणि 28% स्लॅब काढून टाकले आहेत, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे अनेक वस्तू आता स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्वाधिक पसंती असलेल्या आता डीमार्ट या सुपर मार्केटमध्येही त्याचा फायदा होणार आहे.

डीमार्ट हे एक असे सुपरमार्केट आहे जिथे बाराही महिने डिस्काउंट ऑफर सुरू असते. यामुळे अनेकजण डिमार्ट मधून खरेदी करण्याला पसंती दाखवतात.येथे किराणा, कपडे, ब्युटी प्रॉडक्ट, इलेक्ट्रॉनिक वस्तू सार काही स्वस्तात खरेदी करता येते. सर्व वस्तू एकाच छताखाली असल्याने मध्यमवर्ग डीमार्टला अधिक पसंती दाखवत आहेत. डीमार्टचा अलीकडील काही वर्षांमध्ये मोठा विस्तार सुद्धा झाला आहे. आता जीएसटी कपातीच्या निर्णयानंतर साबण, हेअर ऑईल, टूथपेस्ट, टॉयलेट क्लीनर, डिटर्जंट, धूप, अगरबत्ती आणि मेणबत्त्यांवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून पाच टक्के केली आहे. चॉकलेट्स, मिठाई, बिस्किटे, आईस्क्रीम, नमकीन तसेच सॉफ्ट ड्रिंक्सवरील जीएसटी सुद्धा कमी झाला आहे.

सरकारने चहा, कॉफी, दूध पावडर या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून पाच टक्के केली आहे.मिक्सर, ग्राइंडर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के केला आहे. अर्थात सरकारने ज्या वस्तूंवरील जीएसटी कमी केली आहे त्या वस्तू यापुढे डिमार्टमध्ये स्वस्त मिळणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

