वाढ काही थांबेना! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर..

मुंबई : गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
विशेषतः चांदीने या आठवड्यात चांगलाच धक्का दिलाय. तर, सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. आज ४ मार्च २०२५ रोजी १८K, २२K आणि २४K सोन्याचे तसेच एक किलो चांदीचे दर कसे आहेत, ते जाणून घेऊया..
आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट सोन्याचा दर ७९,५५० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ८६,७७० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.
दरम्यान, चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ५००० रुपयांची घसरण झाल्यानंतर, आता चांदीने पुन्हा वाढ दाखवली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा दर ९७,००० रुपये इतका आहे.
वेगवेगळ्या कॅरेटनुसार सोन्याचे दर..
२४ कॅरेट – ८५,३२० रुपये प्रति १० ग्रॅम
२३ कॅरेट – ८४,९७८ रुपये प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट – ७८,१५३ रुपये प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट – ६३,९९० रुपये प्रति १० ग्रॅम
१४ कॅरेट – ४९, ९१२ रुपये प्रति १० ग्रॅम
एक किलो चांदी – ९४,३९८ रुपये