मेट्रोला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद! एकाच दिवसात केला सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास, तोडले सगळे रेकॉर्ड..


पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन झाले. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले.

त्यानंतर मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुणेकरांना मेट्रोचे आकर्षण निर्माण झाले आहे. यामुळे रविवारी सुटी असून मेट्रो प्रवाशांचा विक्रम झाला आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक प्रवासाचा हा विक्रम झाला आहे.

रविवारी इतक्या जाणांनी घेतला लाभ

मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत रविवारी चांगलीच वाढ झाली. एकाच दिवसांत ९६ हजार ४९८ प्रवाशांनी प्रवास केल्याचा विक्रम केला. आतापर्यंत प्रवाशांची ही सर्वोच्च संख्या आहे. पिंपरी चिंचवड मनपा स्टेशनवरुन १३ हजार ३९३ प्रवाशांनी प्रवास केला.

सिव्हील कोर्ट स्थानकावरुन ९,९२८ तर वनाज स्थानकावरुन ९,८७२ जणांनी प्रवास केला. एकूण रविवारी ९६ हजार ४९८ प्रवाशांनी मेट्रोची सफर केली आहे. शनिवार अन् रविवारी मेट्रो प्रवास तीन टक्के सुट दिली जाते.

दरम्यान, पुणे शहरात मेट्रो चालू झाल्यापासून शहरातील लोकांना याचे चांगलेच आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मेट्रो प्रवासांची संख्या देखील वाढत आहे. मेट्रोने प्रवास केल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होत असल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे.

त्याचबरोबर मेट्रो ने प्रवास देखील अगदी काही मिनिटातच होत आहे. त्यामुळे प्रदूषण होणार नसल्याने वातावरण देखील चांगले राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पसंतीस मेट्रो आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!