देवाची उरुळी, फुरसुंगीबाबत मोठी बातमी! गावे वगळण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय..

मुंबई : देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळण्याच्या अधिसूचनेवर सरकारने निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारला दिले आहेत.

तसेच गावे वगळण्याच्या अधिसूचनेला आव्हान देणारी ‘आपले पुणे’ स्वयंसेवी संस्था आणि रणजीत रासकर सह इतर गावकऱ्यांची जनहित याचिका सुनावणीसाठी आज आली. आजची सुनावणी हायकोर्टाने उद्यापर्यंत स्थगित करून उद्या दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी ठेवली आहे.
आज मुंबई हायकोर्टामध्ये मुख्य न्यायाधीश यांच्या बेंच समोर सुनावणी होणार होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आलेल्या गावांच्या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल याचिकाकर्त्यांनी जोडला होता.

दरम्यान, त्या निकालाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले नाही. त्यामुळे तो law of the land होतो. त्यामुळे या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्यापर्यंत ही गावे वगळण्याच्या अधिसूचनेवर सरकारने निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने म्हटले असून तसे न केल्यास निर्णय घेतला जाईल असा इशारा दिला आहे.