राम मंदिराबाबत मोठी माहिती! अयोध्येत प्राणप्रतिष्ठापनेची तारीख जाहीर…


नवी दिल्ली : आयोध्येमध्ये राम मंदिराचे दरवाजे सामान्य जनतेसाठी कधी खुले केले जाणार चर्चा सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून मंदिराचे काम सुरू आहे. आता अयोध्या येथी राम मंदिराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

राम मंदिरात प्रतिष्ठापणेच्या तारीख जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी वर्षात १५ ते २४ जानेवारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यामुळे अनेकजण याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीला यासंबंधी माहिती दिली. प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले जाईल.

तसेच प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील. २४- २५ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

येथील मुख्य दरवाजा सोन्याने मढवला जाणार आहे. त्यावर सोन्याचे नक्षीकाम असेल. मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावरही सोन्याचा मुलामा चढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!