आजीच्या समोरच नातवाला ओढून नेलं, बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा करुण अंत, घटनेने गावात भीतीचे वातावरण…

अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांचे मृत्यु होत आहेत. यामुळे मोठी भीती निर्माण झाली आहे. अनेकजण शेतात बाहेर पडण्यास घाबरत आहेत. असे असताना अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळे कडलग (ता. संगमनेर ) येथील सिद्धेश सूरज कडलग (वय 6) या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, सिद्धेश दारात उभा होता. त्याला बघून पिकात लपून बसलेल्या बिबट्याने अचानाक त्याच्यावर हल्ला केला. त्याला उचलून गवतात नेले. यामुळे मोठी खळबळ उडाली. हा प्रकार त्याच्या आजीच्या लक्षात आला.
नंतर त्यांनी आरडाओरड केल्याने कुटुंबातील सर्व जण तिकडे धावले. बिबट्या सिद्धेशला तेथेच टाकून पळून गेला. चिमुकल्याला असं रक्तबंबाळ अवस्थेत बघून आजीने हंबरडा फोडला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यामुळे कुटूंबावर दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. बिबट्याला ठार करेपर्यंत मुलाचा मृत्यदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर वनविभागाने बिबट्याला बघता क्षणी ठार करण्याचे आदेश दिले होते. त्याचा शोध घेतला जात होता.

कालपासून सुरु असलेल्या शोधमोहिमेनंतर नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अखेर यश आले. मात्र मुलाचा जीव गेल्याने कुटूंबाने एकच आक्रोश केला. दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या घटना घडत असून बिबट्या हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. यामुळे खेडेगावात शेतकरी देखील भीतीच्या वातावरणात राहत आहेत.
