नातवाचा अपघातात मृत्यू, मृतदेह पाहून आज्जीनेही सोडला जीव, अक्कलकोटमध्ये दुःखद घटना….

सोलापूर : नातवाचा मृत्यू सहन न झाल्याने स्मशानभूमीतच आजीनेही आपला जीव सोडल्याची घटना सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात घडली आहे. यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावातील व्हनमाने कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. आदित्य हा चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात इयत्ता नववी शिकत होता.

आदित्यने शाळा सुटल्यानंतर एका दुचाकीस्वाराला हात करत गावाकडे सोडण्याविषयी विनंती केली. त्याचवेळी दुचाकीवर निघालेल्या आदित्यला एका कारचालकने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि गाडीवरील चालक जखमी झाला, तर दुर्दैवी ठरलेल्या आदित्यचा अपघातात मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
एकुलता एक नातू अपघातात मृत्यू पावला त्यामुळे दुःख सहन न झाल्याने त्याच्या अंत्यसंस्कारावेळी आजी जनाबाई व्हानमाने यांनीही जीव सोडला आहे. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावाजवळ आदित्य व्हनमाने या मुलाचा कारने जोरदार धडक दिल्यामुळे अपघाती मृत्यू झाला होता. आजीला जागेवरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

यात आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी आजी आणि नातवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आदित्यचा मृतदेह स्मशानभूमीत पाहिल्यानंतर आजीला धक्का बसला. या घटनेमुळे हन्नूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावातील व्हनमाने कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.
आदित्य हा चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात शिकत होता. दरम्यान, धडक खूपच जोरदार होती. यामध्ये गाडीवरील चालक जखमी झाला, तर दुर्दैवी ठरलेल्या आदित्यचा अपघातात मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात हि घटना घडली आहे.