महादेव कांचन कॉलेजमध्ये भव्य पदवी वितरण समारंभ; मान्यवरांच्या उपस्थितीत 2019-2023 बॅचच्या विद्यार्थ्यांचा गौरव

उरुळी कांचन : अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनच्या महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, उरळी कांचन येथे दि. २२ एप्रिल २०२५ रोजी २०१९-२०२३ बॅचच्या विद्यार्थ्यांचा पदवी वितरण समारंभ अत्यंत उत्साही व गौरवशाली वातावरणात पार पडला. २०१९-२०२३ या शैक्षणिक बॅचमधील विद्यार्थ्यांना औपचारिकरित्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. हा समारंभ कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी ११.०० वाजता संपन्न झाला. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत, विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालणारा आणि पालकांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.
समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. कार्यक्रमाचे संचालन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमासाठी सेमिनार हॉलमध्ये विशेष सजावट करण्यात आली होती आणि विद्यार्थी, पालक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. महादेव तुकाराम कांचन, चेअरमन, अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि शिक्षणासोबतच नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचे महत्व पटवून दिले. त्यांच्या सोबत अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनचे सचिव मा. डॉ. अजिंक्य महादेव कांचन यांनी देखील कार्यक्रमास मान्यता दिली.
या समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून प्रा. रवींद्र भारती (संस्थापक आणि CMD, भारती बिझनेस ग्रुप, पुणे) यांनी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या भाषणात व्यवसायातील अनुभव, मूल्याधिष्ठित नेतृत्व आणि उद्योजकतेवर प्रकाश टाकला.
सन्माननीय पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मृणाल शिरसाठ, प्राचार्य, केएसएस कॉलेज ऑफ फार्मसी, शिक्रापूर, पुणे हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी व नवनवीन संशोधन क्षेत्रातील योगदानाबाबत मार्गदर्शन केले.
पदवी वितरण समारंभात डॉ. अप्पासाहेब एम. जागदळे, कार्यकारी संचालक, अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी भाषण दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी व्हा, संशोधनाकडे वळा, आणि देशाच्या आरोग्य प्रणालीसाठी सकारात्मक भूमिका निभवा, असा दिला. यशस्वी करिअरसाठी कठोर मेहनत, सातत्य आणि चिकाटी यांना पर्याय नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितले.
महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अन्ड रिसर्चचे प्राचार्य डॉ. नितीन एम. गवई यांनी पदवी वितरण समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शब्दांत संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी संशोधन, नैतिकता, आणि नैसर्गिक विवेकबुद्धी या तीन गोष्टींचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना नेहमी नवा विचार, नव्या कल्पना आणि समाजोपयोगी दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि यशस्वी भविष्याची मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात विशेष आमंत्रित पाहुणे म्हणून खालील मान्यवरांनी उपस्थिती लावलीः
सौ. प्रतिभाताई महादेव कांचन, अध्यक्ष अस्मिता बिगर शेती सहकारी पतसंस्था, ऊरुळी कांचन, डॉ. विष्णू हलनोर, संचालक, विश्वा लॅबोरेटरीज प्रा. लि., MIDC कुरकुंभ, पुणे, डॉ. भागवत चव्हाण, प्राचार्य, अन्जल कॉलेज ऑफ फार्मसी, हडपसर, डॉ. गणेश ताटे, संचालक, सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उरळी कांचन, डॉ. मिलिंद थेउरकर, संचालक, सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उरळी कांचन, या सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल गौरवोद्गार काढले.
समारंभात विद्यार्थ्यांना औपचारिकरीत्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. अनेक पालकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनीही आपल्या आठवणी, संघर्ष आणि शिक्षण प्रवासाबाबत आपली भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. नितीन गवई, प्रा. कुणाल हाके (HOD, B. Pharm.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अतिशय चोख समन्वय साधून कार्यक्रम यशस्वी केला
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शेअर केले, शिक्षकवृंदांना धन्यवाद दिले आणि महाविद्यालयाने दिलेल्या शिक्षण व संस्कारांची मनापासून प्रशंसा केली. कार्यक्रमाच्या शेवटी समूहछायाचित्रे व गप्पाटप्पा वातावरणाने समारंभाची सांगता झाली. समारंभानंतर सर्व उपस्थितांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.