Gram Panchayat Elections 2023 : कोण होणार गावचा पुढारी!! आज राज्यात २ हजार ३६९ ग्रामपंचायतींमध्ये काटे की टक्कर…

Gram Panchayat Elections 2023 : राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होईल. तर मतमोजणी उद्या म्हणजेच समोवारी, ५ नोव्हेंबर २०२३ होणार आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा आणि निवडणुकीची आज पहिली झलक आज पाहायला मिळणार आहे. कारण राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वच ग्रामपंचायत मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. Gram Panchayat Elections 2023
नागपूर, अमरावती, भंडारा, वाशीम, गोंदिया, बुलढाणा, वर्धा, नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, लातूर, बीड, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, चंद्रपूर, अमरावती, गोंदिया, परभणी, सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, अकोला, नांदेड, वर्धा, ठाणे, यवतमाळ, रायगड, जळगाव, संभाजीनगर, कोल्हापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये निवडणूक होणार आहेत.

दरम्यान, राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे? हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे.