Gram Panchayat Election 2023 : बारामतीत वर्चस्व कोणाचे? धक्कादायक निकाल हाती, जाणून घ्या…


Gram Panchayat Election 2023 : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचे निकाल हाती येत आहे. पुण्यातील एकूण २३१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका आणि १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पार पडल्या आहेत. यंदाची लढत झालेल्या सत्ताबदलामुळे चर्चेत आली होती. त्यात अजित पवारांच्या बारामतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती पवारसाहेबांची की अजितदादांची असेल? असा सवाल बारामतीकरांसह संपूर्ण राज्याला पडला होता. बारामती तालुक्यातील ३१ पैकी २६ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून यात २४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. दोन ग्रामपंचायतीत भाजपने खाते उघडले आहे. Gram Panchayat Election 2023

बारामतीत आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवई माळ, गाडीखेल, जराडवाडी, करंजे, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी, साबळेवाडी, उंडवडी कप, काळखैरेवाडी, चौधरवाडी, धुमाळवाडी, कऱ्हावागज, सायंबाचीवाडी, वंजारवाडी, करंजे पूल, कोऱ्हाळे खुर्द, शिर्सुफळ, मेडदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विजयी झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!