कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी ; आमदार राहुल कुल यांची मागणी…!


उरुळी कांचन : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली. कांद्या उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा सुरू असताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार राहुल कुल पुढे म्हणाले की , राज्यात उसाची व शेतीची चांगली परिस्थिती असताना मात्र कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला असुन याबाबत राज्य व केंद्र सरकारने एकत्रित येत निर्णय घेतल्यास तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणार आहे अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास आमदार कुल यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!