Govinda : बॉलीवूडमध्ये खळबळ, १००० कोटींचा घोटाळा; मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या, गोविंदाचे काय होणार?


Govinda मुंबई : अभिनेता गोविंदा (Govinda) हा बॉलिवूडचा सदाबहार, लोकप्रिय अभिनेता. गोविंदाने आजवर विविध सिनेमांमधून (Entertainment News )भुमिका साकारुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

गोविंदा यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे . त्यामुळे गोविंदा सध्या १००० कोटींचा पाँझी घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे चाहत्यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. (Govinda)

१००० कोटींचा पाँझी घोटाळ्यात एकूण २ लाखांहून अधिक लोकांची १०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता गोविंदाची चौकशी करण्यात येणार आहे. घोटाळ्यात अभिनेत्याचं देखील नाव समोर आल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून पाँझी घोटाळ्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सोलर टेक्नो अलायन्स अनेक देशांमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीच्या बहाण्याने ऑनलाइन पाँझी योजना चालवत होती. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोक या घोटाळ्याला बळी पडल्याची देखील माहिती समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. (Entertainment News)

दरम्यान अभिनेता गोविंदाने या कंपनीच्या काही प्रमोशनल व्हिडीओंचा प्रचार केला होता. त्यात तो व्हिडीओमध्ये स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.

सध्या गोविंदाने या कंपनीला प्रोत्साहन आणि पाठिंबा दिल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे त्याला आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स जारी केले जाण्याची शक्यता आहे.

त्यानंतर या अभिनेत्याला चौकशीसाठी ओडिशात बोलावले जाऊ शकते. त्यामुळे मनोरंजन (Entertainment News) विश्वात एकच खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!