Govinda : शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या गोविंदाचा आहे दाऊदशी संबंध? ठाकरे गटाने सगळंच बाहेर काढलं, नेमकं काय झालं?


Govinda : बॉलीवूड अभिनेता गोंविदा आहूजा याने पुन्हा एकदा राजकारणात प्रवेश केला आहे. जवळपास १४ वर्षानंतर गोविंदाने राजकारणात पाय ठेवला आहे. अभिनेता गोविंदाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

पण काही वर्षांपूर्वी भाजप नेते राम नाईक यांनी ‘गोविंदा यांनी निवडणुकीत कुख्यात गुंड दाऊद याची मदत घेतली होती’ असा आरोप केला होता. आजही ते आपल्या मतावर ठाम आहेत.

मग आता हिंदुत्वाचे फुकटचे गोडवे गाणारे शिंदे गोंविदासोबत कसा संसार थाटणार आणि कसं जनहित साधणार? असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. शिवसेना यूबीटी गटाने X वर याबाबत पोस्ट करत शिंदेंवर निशाणा साधला आहे.

गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राम नाईक यांनी प्रतिक्रिया देताना, मी माझ्या आरोपावर आजही ठाम असल्याचे म्हटले आहे. गोविंदा यांनी दाऊदची मदत घेतली होती, या आरोपावर मी ठाम आहे. मी माझ्या पुस्तकात या आरोपाचा उल्लेख केला आहे. पण त्यावर गोविंदा काहीच बोलले नाहीत, असे राम नाईक यांनी म्हटले आहे. Govinda

दरम्यान, परराष्ट्र धोरणविषयक अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. अशी शक्यता आहे की, ते उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून गोविंदा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात निवडणुकीत उभे राहतील.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदा यांनी काँग्रेसच्या तिकीटवर उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला होता. त्यानंतर गोविंदा आणि मतदारसंघाचा काही संबंध राहिला नव्हता. आता पुन्हा त्याची चर्चा सुरु झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!