रेशन कार्डधारकांना सरकारचा दणका ; तब्बल साडेतीन लाख रेशन कार्ड रद्द होणार, कारण काय?

पुणे : राज्यातील शिधापत्रिकाधारकांना राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. मागील सहा महिन्यांपासून धान्य न घेणाऱ्या सुमारे 3 लाख 33 हजार शिधापत्रिकांवरील धान्यवाटप बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार, अनेक रेशनकार्ड धारकांनी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून धान्य घेतलेलं नाही. त्यामुळे त्या अप्रचलित शिधापत्रिकांबाबत संशय निर्माण झाला होता. शिधापत्रिका पुन्हा तपासण्याचे आदेश दिले गेले होते. या तपासणीत मृत व्यक्ती, स्थलांतरित किंवा बनावट माहिती असलेल्या कार्डधारकांची नोंद आढळली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सरकारने शिधावाटप बंद करून त्या शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात एकूण 8 लाख 73 हजार शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. तिने सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी धान्य घेतलेले नाही त्यांचं रेशन कार्ड रद्द करून प्रतीक्षेत असलेल्या रेशन कार्डधारकांना त्याचा लाभ द्यावा असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.रद्द केलेल्या शिधापत्रिकांमध्ये मृत शिधापत्रिकाधारकांचा देखील समावेश आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू दाखला काढल्यानंतर त्याची नोंद राज्यपातळीवर ठेवली जाते. त्यानुसार आता मृत व्यक्तींची नावे शिधापत्रिकांवरून हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
