लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय! E-KYC प्रक्रियेस मुदतवाढ, आता ‘या’ तारखे पर्यंत करता येणार…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता ख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ईकेवायसी करता आली नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ई केवायसी मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची 18 नोव्हेंबर 2025 ची तारीख देण्यात आली होती.

आता त्याला अंतिम मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यानुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत EKYC करता येणार आहे. अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
सरकारने या पूर्वी जाहीर केल्यानुसार 18 नोव्हेंबर ही या योजनेसाठी केवायसी करण्याची अंतिम मुदत होती. मात्र आता केवायसीला मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी करता येणार आहे, त्याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आहे.
‘माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे.
याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे.