तळीरामांची होणार मज्जाचं मज्जा! सरकारचा मोठा निर्णय, मद्यविक्रीच्या वेळेत सूट, थर्टी फस्टला झूम बराबर झूम…


पुणे : २०२५ हे वर्ष सरत असून २०२६ हे नवं वर्ष अवघ्या काही तासात सुरु होत आहे. अशावेळी सगळीकडे उत्साहाच आणि सेलिब्रेशनच वातावरण आहे. असं असताना सरकारने मोठा निर्णय मद्यविक्रीत मोठी सूट दिली आहे.

दरम्यान, २०२५ हे वर्ष निरोप घेत असून अवघ्या काही तासांत २०२६ या नव्या वर्षाचे आगमन होणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असताना राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मद्यविक्रीच्या वेळेत विशेष सूट दिली आहे.

तसेच ३१ डिसेंबर २०२५ आणि १ जानेवारी २०२६ या दोन्ही दिवशी दारूची विक्री सुरू राहणार असून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुधारित वेळा लागू करण्यात आल्या आहेत.

       

राज्य शासनाने नववर्ष साजरे करताना नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी मद्यविक्रीची दुकाने, बिअर बार, परवाना कक्ष, क्लब आणि हॉटेल्स निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परवान्याच्या प्रकारानुसार मद्यविक्रीची वेळ वेगवेगळी असणार असून याबाबत उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.

परदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीसाठी असलेल्या एफएल-२, उच्च व अतिउच्च श्रेणीतील एफएल-२ तसेच एफएलडब्ल्यू-२ आणि एफएलबीआर-२ परवान्यांच्या दुकानांना रात्री १०.३० वाजल्यापासून पहाटे १ वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.

तर एफएल-३ परवाना कक्ष आणि एफएल-४ क्लब्ससाठी पोलीस आयुक्तालय क्षेत्रात रात्री १.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत वेळ वाढवण्यात आली आहे, तर इतर भागांत ही वेळ रात्री ११.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत असणार आहे.

बिअर बारसाठी असलेल्या नमुना ‘ई’ आणि ई-२ परवान्यांअंतर्गत मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे. देशी मद्य विक्रीसाठी असलेल्या सीएल-३ परवान्यांमध्ये महानगरपालिका तसेच ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रांत रात्री ११ ते पहाटे १ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे, तर इतर ठिकाणी रात्री १० ते पहाटे १ वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की सार्वजनिक सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार या सवलतीच्या वेळेत कपात करण्याचे किंवा बदल करण्याचे अधिकार असतील. नववर्षाच्या जल्लोषात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!