सरकारचा राष्ट्रीय महामार्गावरील टोलबाबत मोठा निर्णय; 70% पर्यंत मोठी सूट…

पुणे: केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना मोठा दिलासा दिला आहे. टोल कराच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला असून काही मार्गांवर 70 % पर्यंत मोठी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना 70 टक्क्यांपर्यंत टोल टॅक्समध्ये सूट मिळू शकणार आहे. NHI नव्या नियमानुसार दोन लेनच्या राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम सुरू असल्यास 70 टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्सधारकांना फक्त 30 टक्के कर भरावा लागेल.


2026 पासून लागू झालेल्या या नवीन नियमानुसार,दोन लेनच्या राष्ट्रीय महामार्गाचे चार लेन किंवा त्याहून अधिक रुंदीकरण सुरू असल्यास वाहनचालकांकडून पूर्ण टोल कर आकारला जाणार नाही. या महामार्गावर 70 टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना केवळ आता 30% टोलच भरावा लागणार आहे. हा नियम सध्याच्या आणि नवीन अशा दोन्ही प्रकल्पांना लागू असणार आहे.
नव्या सरकारी आकडेवारीनुसार,देशभरात सध्या 25000 ते 30000 किलोमीटर लांबीचे दोन-लेन महामार्ग चार-लेन महामार्गांमध्ये अपग्रे़ड केले जात आहे. या कामासाठी सरकारला 10 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. नव्या नियमामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
