सरकारचा मोठा निर्णय! महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मिळणार दरमहा 2,000 रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती योजनेबद्दल…

पुणे : मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी येऊ नये, यासाठी कमवा शिकवा योजनेंतर्गत विद्यार्थीनींना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी ‘कमवा आणि शिका’ योजना योजनेची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “कमवा आणि शिका” या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थिनींना दरमहा २,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या रकमेच्या मदतीने मुलींना दैनंदिन खर्च भागवण्यासोबतच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास मदत होणार आहे.
यापूर्वीच विद्यार्थिनींना राहण्याची व जेवणाची सोय व्हावी म्हणून निर्वाह भत्त्याच्या स्वरूपात दरमहिना ६,००० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता त्यासोबतच अतिरिक्त मदतीसाठी ही नवी योजना राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, या योजनेअंतर्गत प्रत्येक महाविद्यालय स्वतःकडे शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण करेल. अशा विद्यार्थिनींची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठवली जाईल. योजनेचा लाभ घेणाऱ्या मुलींच्या बँक खात्यात सरकारकडून थेट २,००० रुपये जमा केले जातील.
दरम्यान, राज्य सरकार या योजनेतून सुमारे ५ लाख विद्यार्थिनींना लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी दरमहा 100 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल, असंही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागणाऱ्या मुलींना मोठा आधार मिळणार आहे.