गॅस टंचाईवर सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय! मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा, आता पेट्रोल पंपांवर…


पुणे : राज्यात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधिमंडळात एक मोठा दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. गॅस सिलिंडर मिळेपर्यंत सर्वसामान्यांची चूल पेटती राहावी, यासाठी सरकारने केरोसिनचा साठा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या कंपन्यांच्या अधिकृत पेट्रोल पंपांवर केरोसिन उपलब्ध असेल.

केरोसिन डीलर्सची साखळी विस्कळीत झाल्याने आणि भेसळ टाळण्यासाठी थेट पेट्रोल पंपांवरून वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. उज्ज्वला लाभार्थ्यांना केरोसिन देण्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सरकारने न्यायालयालाही अवगत केले आहे.

छगन भुजबळ यांनी पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून पुरवठा सुधारण्यासाठी चर्चा केली. राज्यातील दैनंदिन गॅस उत्पादन 9,000 वरून 11,000 मेट्रिक टन पर्यंत वाढवण्यात आले आहे. घरगुती ग्राहकांनंतर रुग्णालये, स्मशानभूमी, शैक्षणिक संस्था आणि वृद्धाश्रमांना 100% प्राधान्य दिले जाईल. औषध उद्योग आणि संरक्षण क्षेत्राला 50% प्राधान्य असेल.

छगन भुजबळ यांनी दिला विश्वास….

गॅस टंचाईचा फायदा घेऊन काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध सरकारने कडक मोहीम उघडली आहे. आतापर्यंतच्या कारवाईत 1,208 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून 33 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करून वितरणावर लक्ष ठेवले जात आहे.

एलपीजीचा विषय केंद्र सरकारचा असला तरी आम्ही त्यांच्या सतत संपर्कात आहोत. राज्यात मुबलक साठा उपलब्ध असून केवळ वितरणातील अडचणींमुळे रांगा लागल्या आहेत. पेट्रोल पंपावर केरोसिन मिळण्यास सुरुवात झाल्यावर नागरिकांचा ताण कमी होईल, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!