सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नी देखील खरातच्या जाळ्यात;10 तास चौकशीतून धक्कादायक माहिती..


नाशिक : महिलांना फसवून अत्याचार करणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांचे बिंग फुटल्यानंतर तपासात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. अशातच आता खरातने त्याच्या ‘कॅनडा कॉर्नर’ येथील कार्यालयात केवळ सामान्य महिलाच नाही तर सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नींना देखील जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.गुरूवारी त्याची 10 तासापेक्षांही अधिक काळ एसआयटीच्या पथकाने चौकशी केली. पोलीस कोठडीत देखील खरातचा मंत्रजप सुरु असून त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.तपासात तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.

खरातच्या चौकशीत त्याने असे म्हटले आहे की,महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग आहे.यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार, असेही तो म्हणाला.खरात यांची सध्या एसआयटी चौकशी करीत आहे. आता ED, फॉरेक्स आणि कस्टमच्या रडारवर खरात असून त्याच्या अडचणी आणखीनच वाढणार आहेत. तसेच विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी ते करणार आहेत.

खरातने प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींनाही लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील काही पीडितांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. यातून अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!