महिलांसाठी महत्वाची बातमी! सरकार देत आहे मोफत शिलाई मशीन, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?
पुणे : भारत सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना विविध आघाड्यांवर प्रगती करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. आजही देशात अनेक महिला आहेत, ज्यांना स्वयंरोजगार सुरू करायचा आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने त्यांना ते जमत नाही.
देशांमध्ये अशा अनेक महिला अशा आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. मात्र त्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याने त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही.
मात्र आता या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
‘मोफत शिलाई मशीन योजना’, असे या योजनेचे नाव आहे. शासनाच्या या योजनेत महिला नोंदणी करून मोफत शिलाई मशीनचा लाभ घेऊ शकतात.
या शिलाई मशिनच्या मदतीने महिला अल्प प्रमाणात स्वत:चा स्वयंरोजगार सुरू करू शकतात. सरकारच्या या योजनेचा देशातील अनेक महिला लाभ घेत आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ..
येथे करा अर्ज…
मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला https://www.india.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला येथून अर्ज डाउनलोड करावा लागेल. यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची सर्व आवश्यक माहिती टाकावी लागेल.
फॉर्म भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून ती संबंधित विभागाकडे जमा करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
… तरच तुम्हाला मिळेल शिलाई मशीन
यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. जर तुम्ही अर्जात दिलेली सर्व आवश्यक माहिती बरोबर असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाईल.
यामध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता. त्यामुळे तुम्हाला यामध्ये अचूक माहिती भरणे बंधनकारक आहे.