गायरान जमिनीसाठी सरकार आक्रमक, आता सरकार बजावणार नोटीस, उत्तर द्यावेच लागणार…!
मुंबई : सध्या सरकार दरबारी राज्यातील गायरान जमिनीबाबत चर्चा सुरू आहे. आता अतिक्रमण करणाऱ्यांना नव्याने नोटिसा बजावणार असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली. यामुळे सरकार याबाबत आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.
याबाबत राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, जमिनीवरील ताबा सिद्ध करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाईल. मात्र, यात अपयशी ठरल्यास अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
पुढील 60 दिवसांत महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार ही कारवाई केली जाईल, कायद्यानुसार योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला. त्यावर हे अतिक्रमण करणाऱ्यांना ते कोणत्या सरकारी योजनेसाठी पात्र आहेत हे दाखवून देण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार गायरान जमिनींवर सध्या 2 लाख 22 हजार 153 बेकायदेशीर बांधकामे आहेत. त्यातील 4.52 हेक्टर जमिनीपैकी अंदाजे अतिक्रमित क्षेत्र हे 10 हजार 89 हेक्टर एवढे आहे. असे असताना हे प्रमाण सरकारी मालकीच्या जमिनीच्या निव्वळ 2.23 टक्के आहे, अशी माहिती दिली. यामुळे आता पुढे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.