आयोध्येत रामलल्लांचा प्रतिष्ठापणा दिनी सरकारी सुट्टी द्यावी, राज्य सरकारच्या एका मंत्राने केली मागणी..!!


मुंबई : अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिराचं येत्या २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. हा संपूर्ण देशातील रामभक्तांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मोदींनी सर्वांना घरोघरी दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे.

तसेच, याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. राम मंदिराच्या उद्घाटन असणाऱ्या २२ जानेवारीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, अशी मागणी अतुल भातळकर यांनी केली आहे. “राम मंदिराच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमांना सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी सार्वजनिक सुट्टी आवश्यक आहे.

२२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराचं भव्य उद्घाटन आणि राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. संपूर्ण देशाचे आणि श्रीराम भक्तांचे लक्ष या कार्यक्रमासाठी लागले आहे. त्याचप्रमाणं प्रभू श्री राम हे संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत आहेत.

अयोध्येतील मंदिर हे केवळ मंदिर नसून तर ते राष्ट्र मंदिर आहे. यामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्या नगरीमध्ये भगवान श्री राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना होत असताना महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाची आहे. आपण त्यांच्या मागणीनुसार राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर करावी. तसेच सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याच्या सूचना देऊन सार्वजनिक दीपोत्सवासाठी सुद्धा परवानगी द्यावी, अशी विनंती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!