रामनवमीनिमित्त सरकारी सुट्टी असताना देखील हवेलीतील दस्त नोंदणीची कार्यालये सुरू…!
पुणे : रामनवमीनिमित्त सरकारी सुट्टी असतानाही मार्च एण्ड असल्या कारणाने दस्त नोंदणीसाठी कार्यालयांमध्ये मोठी गर्दी मोठी गर्दी झाली आहे. रामनवमीची सुट्टीमुळे ग्राहकांना अडचण निर्माण झाली असती तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनकडून गुरुवारीही कार्यालये सुरू ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे हवेली दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीसाठी गर्दी पहायला मिळाली.
राज्यात मालमत्ता खरेदीसाठी नवे रेडीरेकनर अर्थात बाजारमूल्य दर घोषित होतात. त्याअनुषंगाने मार्चअखेर दस्त नोंदणीसाठी मोठी गर्दी होती. १ एप्रिलपासून त्याअनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभागाने गुरुवारी (ता. ३०) रामनवमीची सुट्टीे असतानाही दस्त नोंदणीची हवेलीतीलसर्व २७ कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच एक एप्रिलला नवे रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. त्यामुळे अनेक ग्राहकांचा मार्चअखेर दस्त नोंदणीकडे कल असतो.
दरम्यान या काळात गर्दी होत असते. या बाबी लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी हवेलीतील सर्व २७ कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या व पक्षकारांच्या सोयीसाठी ही कार्यालये कार्यालयीन वेळेत सुरू राहतील, अशी माहिती सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी प्रकाश खोमणे यांनी दिली आहे.