समृद्धी महामार्गावर घडणाऱ्या रोजच्या अपघाताबाबत राज्य सरकारला आली जाग, घेतला मोठा निर्णय..


छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात पहायला मिळाले. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या एका खासगी बसच्या अपघातात सुमारे २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास, जखमींना त्वरीत रुग्णालयात हलवता यावे यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्स तैनात करण्यात येणार आहे. यामुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींचे जीव वेळेत वाचवता येणार आहेत. उपचारास विलंब झाल्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच यासाठी राज्य सरकार सध्या विविध हेलिकॉप्टर पुरवणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करत आहे. या चर्चेनंतर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा प्रत्यक्षात राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, एअर अ‍ॅम्ब्युलन्सने आणलेल्या रुग्णांना त्वरीत उपचार मिळावेत, यासाठी नागपूर ते मुंबईदरम्यान महामार्गाजवळ असणाऱ्या कित्येक खासगी रुग्णालयांसोबत राज्य सरकार करार करणार आहे. यामुळे केवळ सरकारीच नाही, तर खासगी रुग्णालयांमध्येही तातडीने उपचार शक्य होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!