रील्स बनवणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! सरकारने आणली खास योजना, सहभागी व्हा आणि मिळवा हजारो रुपयांचे बक्षीस…


नवी दिल्ली : रील्स बनवणं आणि सोशल मीडियावर आपली कला दाखवणं हे आजच्या तरुण पिढीचं आकर्षण बनले असून अशातच आता केंद्र सरकारने एक सर्जनशील आणि कमाईची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘A Decade of Digital India – Reel Contest’ या नावाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली असून, यामध्ये सहभागी होणाऱ्यांना ₹१५,००० पर्यंत रोख बक्षीस मिळू शकते.

दरम्यान, ही स्पर्धा डिजिटल इंडिया मिशनच्या १० वर्षांच्या यशस्वी पूर्णतेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे. डिजिटल सेवांमुळे आपल्या जीवनात काय बदल झाले आहेत, यावर आधारित रील्स तयार करून ही स्पर्धा जिंकता येईल. यासाठी १ ऑगस्ट २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तुम्हाला https://www.mygov.in/task/decade-digital-india-reel-contest या MyGov च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तिथे लॉग-इन केल्यानंतर तुमचं रील सबमिट करता येईल. लॉग-इनसाठी ईमेल, मोबाईल नंबर किंवा सोशल मीडिया अकाउंटचा वापर करता येतो.

दरम्यान, रील्स सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ईमेल किंवा मेसेजद्वारे त्याची पोचपावती मिळेल. तुमचं रील्स जितकं सर्जनशील असेल, तितकं स्पर्धा जिंकण्याचं शक्यता जास्त असते.

या स्पर्धेत एकूण ८५ विजेते निवडले जाणार आहेत आणि एकूण ₹२ लाखांचं रोख बक्षीस वितरित केलं जाणार आहे. बक्षिसे खालीलप्रमाणे आहेत:

टॉप 10 रील्स – प्रत्येकी ₹15,000, पुढील 25 विजेते – प्रत्येकी ₹10,000, पुढील 50 विजेते – प्रत्येकी ₹5,000

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!