ज्यांच्या फक्त नावाने राजकारण्यांना घाम फुटतो अशा तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार? महत्वाची माहिती आली समोर…

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. याठिकाणी राजकीय नेत्यांच्या संबंधीत अनेक गुन्हेगारी पुढे येत आहे. यामुळे आता याठिकाणी एखादा कर्तव्यदक्ष गुन्हेगारीला आळा घालेल असा अधिकारी हवा आहे. जालना, बीड आणि परभणीत अलीकडच्या काळात धक्कादायक घटना घडल्या आहेत.

यामुळे या गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तुकाराम मुंढे यांना मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्त करावे. तुकाराम मुंढे हे एक सक्षम अधिकारी आहेत, असे दमानिया यांनी म्हटले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तुकाराम मुंढे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सध्या मराठवाड्याला खमका अधिकारी देण्याची गरज आहे. हा अधिकारी कोणाचंही न ऐकणारा, कोणालाही न जुमानणारा असला पाहिजे. त्यामुळे आता बीडसह मराठवाड्यात मुंडे विरुद्ध मुंढे करण्याची वेळ आली आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारने बीडमध्ये तुकाराम मुंढे यांना अधिकारी म्हणून पाठवले पाहिजे, असेही दमानिया यांनी सांगितले. सध्या बीडमध्ये रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. जिल्ह्यातील आमदारांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करत आहेत. याबाबत रोज व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
तसेच अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, धनंजय मुंडे हे आता मंत्री राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना दिलेला बंगला त्यांनी खाली केला पाहिजे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर बंगला खाली करायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी तसे केले नसले तर आता या बंगल्यातील धनंजय मुंडे यांचे सामान बाहेर फेकून हा बंगला खाली केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
