गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल करणारा अखेर सापडलाच! धक्कादायक माहिती आली समोर


 

पुणे : काही दिवसांपूर्वी नृत्यांगणा गौतमी पाटीलचे कपडे बदलतानाचे अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होते. यामुळे संताप व्यक्त केला जात होता.

पोलीस तपास सुरू असताना ह्या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील एका अल्पवयीन मुलाने गौतमी पाटील या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून गौतमी पाटीलचे आक्षेपार्ह व्हायरल केल्याप्रकरणी जेरबंद केल आहे.

अनेक ठिकाणी तर स्टेजच्या बाजूलाच चार पडदे टाकून एक रुम तयार करण्यात आलेली असते. या ठिकाणीच नृत्यांगना दुसरे कपडे परिधन करून स्टेजवर नव्या गाण्यावर अदाकारी करायला येतात.

प्रत्येक गाण्याच्यावेळी या नृत्यांगना कपडे बदलून येत असतात. गौतमीही त्याला अपवाद नव्हती. पण एका विकृताने तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल केला. त्यामुळे गौतमी आणि तिचा मंच खडबडून जागा झाला.

आता याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गौतमीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंदवण्यात आली असल्याचे वृत्त समोर आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!