Gopichand Padalkar : मोठी बातमी! भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची धनगर आरक्षणासाठी मोठी घोषणा..


Gopichand Padalkar सांगली : एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज आक्रमक झालेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला आहे. भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्या सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. Gopichand Padalkar

कुणी कितीही राजकारण केले तरी धनगर समाज त्याला बळी पडणार नाही. मराठा समाज आणि धनगर समाज मोठे समाज आहेत. गरज पडली तर बाळू मामा व्हायचं नाही तर बापू बिरू वाटेगावकर व्हायचं, असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहे. Gopichand Padalkar

माझा सरकारला अल्टिमेटम आहे. तुम्ही काहीही करा, पण धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, अशी मागणीही पडळकर यांनी केली. सांगली या ठिकाणी धनगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गोपीचंद पडळकर बोलत होते.

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी एका नव्या संघटनेची स्थापना केली. हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेची पडळकर यांनी स्थापना केली. ही अराजकीय संघटना असेल. फक्त मेंढपाळ समाजासाठीच ही संघटना काम करेल, अशी घोषणाच गोपीचंद पडळकर यांनी केली.

शरद पवार १९९० ला मुख्यमंत्री होते. त्यावेळी धनगरांना आरक्षण मिळाले असते. पण तसे झाले नाही. पण आता धनगरांना आरक्षणाच्या आड कोणी आला तर त्याला तुडवू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!