गुंडांना हद्दपारी ; वडगाव मावळमध्ये कुख्यात गुंड किरण मोहिते व टोळीवर ‘मोक्का ‘


पुणे : वडगाव मावळ येथील कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याची टोळी गंभीर गुन्ह्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आतापर्यंत सातारा, रायगड जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी करणे, घातक हत्याराचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी उकळणे, मारहाण करुन जबरी चोरी करणे, डॉक्टरांवर हल्ला करणे, कट करुन खंडणी मिळविण्यासाठी खुन करण्यासाठी जबरदस्तीने पळवुन नेऊन खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर गर्दी जमाव जमवुन खुनाचा प्रयत्न करणे, अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे त्यांनी केले आहेत. आता या प्रकरणी त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

टोळी प्रमुख किरण एकनाथ मोहिते (वय 20) एकनाथ अर्जुन मोहिते (वय 53 ) रविद्र लक्ष्मण मोहिते (वय 33 )मयूर ऊर्फ चाण्या बजरंग मोठचे (वय 26) करण रमेश पवार (वय 25) सुशांत अनिल साबळे (वय 24 ) या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे आदेशाला कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याच्या टोळीने संतोष रामभाऊ साळुंखे यांना तु आमच्या बापासाठी काय केलेस” असे म्हणुन वाद घालून “तुला आता सोडत नाही, तुला दाखवतोच ‘अशी धमकी देवुन शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच संतोष साळुंखे यांच्या डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत शाहरुक हनिफ अत्तार (वय 32 रा. चिखली, पुणे) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याच्या टोळीवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109,191(2),191(3),190, 351(3), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. सर्व आरोपी हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक आर. आर. मोहिते यांनी 7 आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.दरम्यान, कुख्यात गुंड किरण मोहिते व त्याच्या टोळीवर 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर टोळीवर कायद्याचा वचक रहावा व त्यांची दहशत असणाऱ्या परीसरात शांतता प्रस्थापित व्हावी. या दृष्टीकोनातून कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी गुन्ह्यांच्या संदर्भातील कागदपत्रांचे पडताळणी करुन कुख्यात गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे.

तसेच वरील गुन्ह्याचा तपास लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, पोलीस उपनिरीक्षक आर. आर. मोहिते, अभिनीत सावंत, पासलकर, राजू मोमोग, सागर नामदास, तुषार भोईटे, आाबळे, पोलीस अंमलदार महेश बनकर, अमोल कसवेकर, किरण नांगरे, गणेश खेळकर, सिध्दार्थ वाघमारे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!