पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!! अजून एक मेट्रो स्थानक आजपासून पुणेकरांच्या सेवेत दाखल…

पुणे : पुणे शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. महामेट्रोकडून पुणे महानगरपालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू करण्यात आली आहे. या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरणाचे काम देखील महा मेट्रोकडून हाती घेण्यात आले आहे.यामुळे याचा अनेकांचा फायदा होणार आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी यादरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे.
हा तिसरा मेट्रो मार्ग राहणार असून याला पुणेरी मेट्रो या नावाने ओळखले जात आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. आता आजपासून चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील एक महत्त्वाचे मेट्रो स्थानक पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या मेट्रो मार्गावरील खडकी मेट्रो स्थानक आज पुणेकरांसाठी खुले करण्यात आले आहे. हा मेट्रो मार्ग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच पीपीपी तत्त्वावर विकसित केला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खडकी मेट्रो स्थानक सुरू झाल्यानंतर प्रवाशांना खडकी, पुणे विद्यापीठ, औंध आयटी पार्क, खडकी कॅन्टोन्मेंट, रेंज हिल, औंध रस्ता, ऑर्डीनन्स फॅक्टरी हॉस्पिटल, मुळा रस्ता अश्या महत्वाच्या ठिकाणी पोहचणे सोपे होणार आहे.
दरम्यान, हे स्थानक पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. हे मेट्रो स्थानक खडकी रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळ आहे. तसेच या मेट्रो स्थानकातून प्रवाश्याना थेट खडकी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात पुणे, मुंबई आणि नागपूर या शहरांमध्ये मेट्रो ची सेवा सुरू झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे या शहरांमधील नागरिकांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. यामुळे पुढील काळात याबाबत अजून विस्तार केला जाणार आहे.