खुशखबर! महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; ‘या’ भागात पावसाची एन्ट्री

पुणे : महाराष्ट्रात ४८ तासांत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री झाली आहे. मान्सून आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरीही समाधानी झाला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळं काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
का लांबला मंत्रिमंडळ विस्तार?, पाच मंत्री वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर भाजपचा दबाव?

तसेच दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भागही नैऋत्य मॉन्सूनने व्यापला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी दिली आहे.
आई कुलस्वामिनी तुळजाभवानीला आतापर्यंतचे सर्वात मोठे दान! दानपेटीत आढळले एवढ्या; कोटींचे हिरे
मान्सूनने आज पश्चिम किनारपट्टीवरच्या कर्नाटकातल्या कारवारपर्यंत मजल मारली आहे. येणाऱ्या दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मॉन्सूनने गुरुवारी (ता.८) केरळमध्ये हजेरी लावली. तर शनिवारी (ता. १०) मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली. आता हा मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रकरणी तरुणाला जामीन मंजूर
अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे बंगालचा उपसागर ते म्यानमार किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे.
या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू राहिल. मान्सूनसाठी निर्माण झालेल्या पोषक स्थितीमुळे मान्सून पुढील दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत. परंतु आता मान्सूनचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच चिंतेला पूर्णविराम लागला आहे. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.