आनंदाची बातमी! सोने ‘इतक्या’ हजारांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर..

मुंबई : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे . गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.
सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोमवारी आणि मंगळवारी सोन्यात मोठी वाढ नोंदवली गेली. तर बुधवारी किंमतीत घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात देखील सोन्याने माघार घेतली असल्याचं चित्र आहे. याउलट, चांदीच्या दराने जोरदार उसळी घेतली आहे.
सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८०,३५० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ८७,६४० रुपये आहे. मागील आठवड्यात ५००० रुपयांनी घसरलेली चांदी आता पुन्हा वाढत आहे. सोमवारी आणि बुधवारी प्रत्येकी १,००० रुपयांची वाढ झाल्याने एक किलो चांदीचा दर ९९, ००० रुपये पर्यंत पोहोचला आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे दर..
२४ कॅरेट – ₹८५,८७६ प्रति १० ग्रॅम
२३ कॅरेट: ₹ ८५,५३२ प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट: ₹७८, ६६२ प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट: ₹६४,४०७ प्रति १० ग्रॅम
१४कॅरेट: ₹५०,२३८ प्रति १० ग्रॅम
एक किलो चांदी: ₹९६,४६०