बीडच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ ठिकाणी होणार नवीन विमानतळ, जाणून घ्या..

बीड : बीडच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे सुरू झाल्यानंतर आता बीडमध्ये विमानही लँड होणार आहे. यासाठी प्रशासनाने कामखेडा परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी जागा निश्चित केली आहे.

एअरपोर्ट प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी कामखेडा परिसराची पाहणी केली. प्राथमिक चर्चेतून असा निष्कर्ष काढण्यात आला की, बीड जवळील कामखेडा परिसर विमानतळ प्रकल्पासाठी सर्वात योग्य ठरेल.

या संदर्भात एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी कामखेडा परिसराची पाहणी केली. प्राथमिक चर्चेतून असा निष्कर्ष निघाला आहे की, बीडजवळील कामखेडा हा परिसर विमनतळ उभारणीसाठी सर्वात अनुकूल आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कामखेडा परिसरात विमानतळासाठी आवश्यक असणारी २०० एकरांपेक्षा अधिक सरकारी जमीन उपलब्ध आहे. जमिनीचा उतार, हवामान, आणि भूगोल विमानतळ उभारणीसाठी पोषक असल्याने हे ठिकाण अंतिम करण्यात येण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे १७० हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यापैकी ८० हेक्टर जमीन राज्य सरकारकडे आधीपासून उपलब्ध आहे. उर्वरित जमीन भूसंपादनाद्वारे मिळवली जाणार आहे.
प्रशासनाने या प्रकल्पासाठी भूसंपादन, डिझाईनिंग आणि बांधकामाची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. बीड विमानतळ पूर्ण झाल्यानंतर तो महाराष्ट्रातील नव्या विमानतळांपैकी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः कामखेडा परिसराला भेट देत विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा, सुरक्षा निकष आणि पर्यावरणीय बाबींचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, विमानतळ सुरू झाल्यानंतर बीडचा संपर्क मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांशी थेट हवाई मार्गाने होणार आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवास वेळ कमी होईलच, पण पर्यटन, उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. स्थानिक व्यापारी, उद्योगपती आणि नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून, बीडच्या विकासासाठी ही मोठी पायरी ठरेल असे मत व्यक्त केले आहे.
