शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदाच्या दिवाळी सुट्ट्या ‘या’ तारखेपासून होणार सुरु, जाणून घ्या..


पुणे : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवरात्रीच्या सणानंतर येणाऱ्या महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भरपूर दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने या सुट्टीबाबत महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे.राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, राज्यातील सर्व शाळांना रविवारसह एकूण १२९ दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

दरम्यान, यात ५३ रविवार आणि सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती, उन्हाळी सुट्टी यांसारख्या ७६ सुट्ट्या समाविष्ट आहेत. शाळांमध्ये किमान २२० दिवसांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून ही योजना आखली गेली आहे.

       

विद्यार्थ्यांना यावर्षी दिवाळीमध्ये१२ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी १६ ऑक्टोबरपासून सुरू होऊन २७ ऑक्टोबरपर्यंत राहील. या काळात राज्यातील सर्व शाळा बंद राहतील.२८ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होतील.

दिवाळीपूर्वी शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षा घेण्यात येणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा, प्रश्नपत्रिका तयारी आणि मूल्यमापनाचे काम सुरू आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले की, दिवाळीपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे मूल्यमापन पूर्ण झाल्यावरच शाळांना सुट्टी दिली जाईल.

याआधी बहुतेक शाळा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम परीक्षा घेत असत. मात्र, यंदा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं ८ ते २५ एप्रिल या कालावधीत अंतिम सत्र परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात २ मेपासून १४ जूनपर्यंत सुट्टी मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!