पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नवीन मेट्रो लाईन, जाणून घ्या..

पुणे : पुणेकरांसाठी वाहतुकीच्या क्षेत्रात मोठी खुशखबर आहे. पुणे मेट्रो लाईन-३ चाचणी आता बाणेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर असा हा २३ किलोमीटर लांबीचा मार्ग असून, मे २०२६ पर्यंत संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

या प्रकल्पामुळे आयटी कर्मचाऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. शहराच्या वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा उंचावण्यासाठी हा टप्पा ऐतिहासिक मानला जात आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी, म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी, हिंजवडी येथून पहिल्यांदाच मेट्रो(Pune Metro) सुरू करण्यात आली होती. त्यावेळी या प्रकल्पाने पुणेकरांसाठी एक नवा अध्याय उघडला. सध्या मान डेपो ते बालेवाडी स्टेडियम या स्टेशन क्रमांक १० पर्यंत चाचणी सुरू आहे आणि आता ती बाणेरपर्यंत विस्तारली जाणार आहे. या चाचणी ऑपरेशन्समुळे प्रकल्पाची गती अधिक वाढली आहे.

पुणे मेट्रो लाईन-३ हा शहराच्या विकासात मोठा वाटा उचलणारा प्रकल्प आहे. या मार्गाद्वारे हिंजवडीसारख्या आयटी हबला शिवाजीनगरसारख्या मध्यवर्ती भागाशी थेट जोडले जाणार आहे. त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना वाहतुकीतील कोंडीपासून मोठा दिलासा मिळेल. शिवाय, पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे, कारण रस्त्यावरच्या खाजगी वाहनांची संख्या कमी होईल.
या प्रकल्पामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर शहरातील व्यापारी, विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या लोकांनाही वेळ आणि खर्च या दोन्ही बाबतीत फायदा होणार आहे. मेट्रोच्या सेवेमुळे शहराच्या आर्थिक प्रगतीतही वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.