पुणेकरांसाठी कामाची बातमी! पुणे रेल्वे स्थानकावरून नवीन सुरू झालेली एक्सप्रेस, 23 ऑगस्टपासून धावणार, जाणून घ्या…

पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे कडून विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पुणे ते रत्नागिरी दरम्यान दोन साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामुळे कोकणात जाणारांसाठी आनंदाची बातमी आहे.
यामध्ये एकूण बारा फेऱ्या होणार आहेत. यामध्ये पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वे (ट्रेन क्रमांक 01447/01448) सहा फेऱ्या होणार आहेत. रेल्वे क्रमांक 01447 23 ऑगस्ट 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री बारा वाजून 25 मिनिटांनी सोडली जाणार आहे. रत्नागिरी येथे ही गाडी सकाळी 11 वाजता पोहोचणार आहे.
परतीची गाडी क्रमांक 01448 23 ऑगस्ट 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर रोजी रत्नागिरी येथून दुपारी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सोडले जाणार आहे आणि पुणे येथे पहाटे 5 वाजता ही गाडी पोहोचणार आहे. तसेच पुणे-रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वेच्या म्हणजेच गाडी क्रमांक 01445 / 01446 च्या सहा फेऱ्या होणार आहेत, असेही सांगितले आहे. गाडी क्रमांक 01445 26 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री बारा वाजून 25 मिनिटांनी सोडली जाणार आहे.
रत्नागिरी येथे सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच गाडी क्रमांक 01446 26 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून दुपारी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सोडले जाणार आहे आणि ही गाडी पुण्याला पहाटे पाच वाजता पोहोचणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, या गाड्या गाड्या चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. तसेच आतापासूनच याचे आरक्षण करावे लागणार आहे.